Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

दरमहा एक लाख रुपये परतावा देण्याचे अमिष; दहा लाख रुपयांची फसवणूक!

दरमहा एक लाख रुपये परतावा देण्याचे अमिष; दहा लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा एक लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एप्रिल 2024 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत पवनेश्वर मंदिराजवळ पिंपरी गाव येथे घडली आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रवींद्र सुभाषराव शीलवंत (वय 48, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. उमेश हरिराम कलानी (वय 28, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपण युके ग्रुप ऑफ कंपनीचा मालक असल्याचे सांगत फिर्यादी सह अन्य लोकांना गुंतवणुकीचे आमीष दाखवले. कंपनीत दहा लाख रुपये गुंतवल्यास पहिल्या दहा महिन्यात दरमहा एक लाख रुपये आणि दहाव्या महिन्यात मूळ रकमेसह नफा परत देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने दहा लाख रुपये गुंतवले. मात्र मुदत संपल्यानंतरही आरोपीने ठरल्याप्रमाणे कोणतीही रक्कम परत न देता फसवणूक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहे .

indra dairy
indra dairy

सोसायटीच्या पार्किंग मधील दोन दुचाकी चोरीला!
पिंपरी : सोसायटीच्या आवारात लॉक करून पार केलेल्या दोन होंडा शाईन दुचाकींचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्या. ताथवडे येथील अशोक नगर परिसरात शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी बापू अजिनाथ गायकवाड (वय 45, रा. ताथवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याच्या शेजाऱ्याने आपल्या होंडा शाईन कंपनीच्या दोन दुचाकी नेहमीप्रमाणे लॉक करून सोसायटीच्या आवारात पार केल्या होत्या. पहाटे आरोपींनी संगणमत करून दोन्ही दुचाकींचे लॉक तोडले आणि एकूण 40 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी चोरून नेल्या. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"