Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

18th September 2026
गुन्हेगारी

अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी महिलेवर कारवाई!

अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी महिलेवर कारवाई!

पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
पिंपरी : गोपनीय बातमीच्या अनुषंगाने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वर्ग लॉज येथे बांगलादेशी महिला अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) मिळाल्याने त्यांनी छापा टाकून सदर महिलेस ताब्यात घेतले.

viara vcc
viara vcc

तन्हा खातून ही संशयित पश्चिम बंगाल येथील महिला लॉज मध्ये मिळून आली. एटीबीने पडताळणी केली असता तिचा आधार कार्ड बनावट असल्याचे आढळून आले. आरोपीकडे सखोल पडताळणी केली असता तिचे बांगलादेशी नाव फीहा मुजीबुर रहमान (वय 19,रा. ग्राम बोईरा, पो. रायर छोरा, ठाणा. जमालपूर, जि. मदारगंज, बांगलादेश) असल्याचे सांगितले.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनाधिकृतपणे आली असल्याचे कबूल केले. तिच्या मोबाईल फोन मधील आयएमओ ॲप व व्हाट्सअप च्या माध्यमातून बांगलादेशातील आई-वडील व इतर नातेवाईकांशी संपर्क करत असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कार्यवाहीसाठी देहूरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात या महिलेला देण्यात आले असून परकीय नागरिक नोंदणी शाखा पिंपरी चिंचवड यांचे मार्फत भारताबाहेर बांगलादेशमध्ये हद्दपार करण्याची कार्यवाही विशेष शाखेतर्फे चालू करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार अनधिकृत बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल न करता त्यांना तात्काळ हद्दपार करण्याची कारवाई सुरू करण्यात यावी असे म्हटले आहे. दोन मे 2025 ते 18 सप्टेंबर 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड आयुक्तालयहद्दी मधून एटीबी द्वारे एकूण 26 बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशमध्ये हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा धीरज पाटील यांनी दिली आहे. ही कारवाई उप आयुक्त विशेष शाखा धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"