Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

17th September 2026
पिंपरी-चिंचवड

भोसरी पीएमटी चौक परिसरातील 18 अवैध टपऱ्यांवर कारवाई!

भोसरी पीएमटी चौक परिसरातील 18 अवैध टपऱ्यांवर कारवाई!

पिंपरी : भोसरी पीएमटी चौक परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या काही टपऱ्यांवर अवैधरित्या दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीवरून भोसरी पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्त मोहिमेद्वारे 18 अवैध टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 चे मारुती जगताप यांनी दिली.

viara vcc
viara vcc

भोसरी पीएमटी चौक हा नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला परिसर असून या ठिकाणी असलेल्या पान व खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांच्या परिसरात काही व्यक्तींकडून दारूचे सेवन केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपाणास प्रोत्साहन मिळवून नागरिकांना त्रास होत होता. परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे भोसरी पोलीस स्टेशन व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त पथकाने बुधवार 16 सप्टेंबर रोजी पीएमटी चौक परिसरातील टपऱ्यांची तपासणी करून अतिक्रमण व अनधिकृतपणे सुरू असलेल्या टपऱ्यांवर कारवाई केली. या संयुक्त मोहिमेत परिसरातील एकूण 18 टपऱ्या निष्काशीत करण्यात आल्या.

indra dairy
indra dairy

तसेच उघड्यावर दारू पिणाऱ्या व्यक्तींवर एक जानेवारी 2026 ते आज पर्यंत 179 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पीएमटी चौक परिसरातील अनधिकृत व्यवसायांना आळा बसण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रकारांना प्रतिबंध बसणार आहे. भोसरी पोलीस स्टेशन कडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अवैध व्यवसाय तसेच नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या प्रकारांविरुद्ध यापुढेही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"