Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

17th September 2026
गुन्हेगारी

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; दोन लाख रुपये जप्त!

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; दोन लाख रुपये जप्त!

गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकाची कामगिरी
पिंपरी : बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या घरपोडीच्या गुन्ह्याचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीन पथकाने छडा लावला आहे .याप्रकरणी एका आरोपीला अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील दोन लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही घरफोडी खेड तालुक्यातील सेल पिंपळगाव, ढासे वस्ती, मोहितेवाडी येथे 24 जुलै 2026 रोजी येथे करण्यात आली होती.

viara vcc
viara vcc

फिलिप्स नादर चव्हाण (वय 33, रा. चिंचोडी पाटील, ता.जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार छगन चिंतामण काळे (रा.कडा, आष्टी, ता. जि. बीड) याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अमोल एकनाथ पोतले यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात 24 जुलै रोजी फिर्याद दिली आहे. सकाळी पोचले यांचे घर बंद होते .त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.

indra dairy
indra dairy

गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासा दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिस अंमलदार सोनवणे यांना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी बाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली पाटील येथे सापळा रचून फिलिप चव्हाण याला जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदार छगन काळे यांच्यासोबत मिळून सेल पिंपळगाव येथील घरफोडी केल्याची कबुली दिली.

घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने काळे यांनी विकले होते. त्यातून फिलिपच्या वाट्याला आलेली दोन लाख रुपयांची रोख रक्कम त्याला देण्यात आली होती. ही रक्कम पोलिसांनी चव्हाण यांच्याकडून जप्त केली. फरार छगन काळे याचा शोध सुरू आहे .चाकण दक्षिण पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा येऊन युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, पोलीस अंमलदार सोनवणे, भोसुरे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"