Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
गुन्हेगारी

आर्थिक वादातून मित्रावर गोळीबार; दोघांना अटक!

आर्थिक वादातून मित्रावर गोळीबार; दोघांना अटक!

पिंपरी : आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून मित्रावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिखलीतील जाधववाडी येथील ऑलिओ हॉटेल जवळ सोमवार 14 सप्टेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. रवी धनाजी घोगरे (वय 26, जाधववाडी चिखली) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

viara vcc
viara vcc

स्वप्निल कांताराम जाधव (वय 37), रोशन पिंगळे (वय 28, दोघेही रा. जाधववाडी, चिखली) यांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. जखमी रवी घोगरे याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी घोगरे आणि आरोपी स्वप्निल जाधव हे मित्र असून रवी याचा फ्लेक्सचा व्यवसाय आहे. तो जमीन खरेदी विक्रीची ही कामे करतो. स्वप्निल याचाही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मध्यरात्री रवी ऑलिओ हॉटेल जवळ गेला असता आरोपी स्वप्निल हा चालक रोशन पिंगळे यांच्यासोबत तेथे उपस्थित होता. जुन्या आर्थिक देवाणघेवाणी वरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर स्वप्नीलने ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याच्याकडील पिस्तुलातून फिर्यादी रवी घोगरे याच्या दिशेने गोळी झाडली. गोळी पोटात लागल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, जिवंत काडतुस, आरोपीचे वाहन आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पिस्तूल आरोपीने कोणाकडून आणले याचाही तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर,पोलीस निरीक्षक फडतरे करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"