गणेशउत्सव शांततेत सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी 18 गुन्हेगार तडीपार!

जानेवारी 2026 पासून 53 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
पिंपरी : गणेश उत्सव सणांच्या कालावधीत गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ दोन हद्दीमधील 18 गुन्हेगारांवर तडीपाराचे आदेश बजावण्यात आले आहेत. पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे प्रदीप जाधव यांनी दिली.


तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये रोहन नानासाहेब शेवंते (वय 24, रा. लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे), विद्या अनिल राठोड (वय 42, रा. अष्टविनायक कॉलनी, कलाटे नगर, वाकड), रेश्मा मिथुन अटोटे (वय 34, रा. बालाजी नगर, भोसरी), पंकज संतोष चोथे (वय 27, रा. जगताप नगर, लेन नंबर चार, थेरगाव), आदित्य बाबासाहेब शेंडगे (वय 22, रा. सुनिता अपार्टमेंट, पिंपळे सौदागर), युवराज चांगदेव फुगे (वय 22, रा. जांभूळ पार्क लेन नंबर 6, पिंपळे गुरव), आशिष उर्फ दादल्या एकनाथ शेटे (वय 24, राम कृष्णा कॉलनी, गोडांबे चौक, नखाते वस्ती, रहाटणी), श्रवण विजय माचरे (वय 20, साई कृष्ण पार्क, ई- बिल्डिंग रूम नंबर 302, डांगे चौक, थेरगाव), सुशील बाळू शिंदे (वय 23, रा. श्रीकृष्ण कॉलनी नंबर एक, नढे नगर, काळेवाडी), ऋषिकेश हरी आटोळे (वय 23, रा. पवारनगर, गल्ली नंबर 7, बेलठिकानगर), अमिन खाजाभाई शेख (वय 55, रा.शी/ओ, संजय भोंडवे एस बी पाटील शाळेजवळ, भोंडवे वस्ती, रावेत), नितीन पांडुरंग गव्हाळे (वय 27, रमाबाई नगर, रावेत), अशोक सदाशिव गायकवाड (वय 41, रमाबाई नगर, रावेत), ज्योती नटवर उर्फ नटरू मारवाडी (वय 41, रा. पाण्याच्या टाकी समोर रा. जांबे, ता मुळशी), एडविन अँथोनी फर्नांडिस (वय 30, एक्झर्बिया सोसायटी नेरे ,दत्तवाडी, नंबर 12), किरण देवी मनोज नट (वय 29, रा. स्मशानभूमी जवळ महाळुंगे, ता. मुळशी), संदीप बबन भुंडे (वय 46, तलाठी ऑफिस जवळ पाटील नगर, बावधन), नितीन रामेश्वर भारती (वय 25, रा. शालिनी निवास, बालाजी नगर, पिरंगुट), सम्राट भागवत शिंदे (वय 20, अर्जुन नगर, उत्तम स्विटजवळ जवळ, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, महाळुंगे) यांचा समावेश आहे.
जानेवारी 2026 ते आज पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील 53 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ एक 11, परिमंडळ दोन 19, परिमंडळ( 3) 10, परिमंडळ (4) 13, गुन्हेगारांचा समावेश आहे,
गणेशउत्सव शांततेत सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सराईत गुन्हेगार, समाज विघातक प्रवृत्तीचे इसम तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सातत्याने व कठोरपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच या काळात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा अथवा नागरिकांच्या शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. तात्काळ कठोर व प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे रोहिदास पवार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी सांगितले.

