Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

जेष्ठ नागरिकाची हातचलाखी करुन अंगठी लांबविली!

जेष्ठ नागरिकाची हातचलाखी करुन अंगठी लांबविली!

पिंपरी : जेष्ठ नागरिकाला रामाचे मंदिर कोठे आहे असे विचारून तुमच्या हाताने दान करायचे आहे असे बोलून एका व्यक्तीने आपल्या जवळील पाचशे रुपयांची नोट फिर्यादी यांच्या हातावर ठेवून त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी हात चलाखीने व नजर चुकवून काढून घेऊन प्रसार झाला. ही घटना मंगळवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा हार्डवेअर दुकानाच्या अपोजिट साईडने भुमकर चौक, वाकड येथे घडली.

याप्रकरणी विठ्ठल केशव धवणे (वय 82, रा. बी -301, व्हिस्टेरिया सोसायटी, मारुंजी रोड, भुमकर चौक, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक अनोळखी अंदाजे वय 40 ते 45 अंगाने मजबूत काळपट रंगाचा हाफ बाहेरचा शर्ट असलेला व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपीने रामाचे मंदिर कोठे आहे असे विचारून तुमच्या हाताने दान करायचे आहे असे बोलून फिर्यादीच्या उजव्या हातावर 500 रुपये ठेवून हात चलाखीने व नजर चुकून त्यांच्या उजव्या हातातील अंगठ्याच्या शेजारील बोटांमधील सोन्याची 75 हजार रुपये किंमतीची अंगठी आरोपी काढून घेऊन पसार झाला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वांगनेकर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

बनावट सही करून मिळकतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न!
पिंपरी : आईच्या मृत्यू पत्रानुसार भावाच्या नावावर झालेल्या मिळकतीच्या कागदपत्रांमध्ये बनावट संमती पत्र आणि सहीचा वापर करून स्वतःचे नाव समाविष्ट केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना थेरगाव येथील ग प्रभागात 29 जून 2026 रोजी घडली आहे.

याप्रकरणी बाळकृष्ण बंकट टोपे (वय 53, भोरडे नगर थेरगाव यांनी बुधवार नऊ सप्टेंबर रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू बंकट टोपे (वय 57, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या आईने नोंदणीकृत मृत्युपत्राद्वारे संबंधित मिळकत त्यांच्या नावावर केली होती. मात्र आरोपीने फिर्यादीची बनावट सही असलेले संमती पत्र आणि बनावट मजकूर महापालिकेच्या ग क्षेत्रिय कार्यालयातील कर संकलन विभागाकडे सादर केला. त्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करून संबंधित मिळकतीवर स्वतःचे नाव समाविष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"