डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 21 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : एका ज्येष्ठ नागरिकाला पोलीस असल्याचे भासवून त्यांना तुम्ही दहशतवाद्यांना फंडिंग केले आहे असे खोटे सांगून अटक करण्याची धमकी दिली. डिजिटल आरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून 21 लाख रुपये आरटीजीएस द्वारे घेऊन फसवणूक केली. ही घटना पाच सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2026 पर्यंत रात्री चे सुमारास स्क्रीन स्टोन सोसायटी, उद्योग नगर, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी महिला फिर्यादी (वय 56, रा. के- 701, क्वींन्स टाऊन सोसायटी, उद्योगनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. अनोळखी आयसीआयसीआय बँक खाते धारक, सिटी युनियन बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी फिर्यादी यांचे वडिलांना पोलीस असल्याचे भासवून त्यांचे दहशतवाद्यांना फंडिंग झाले आहे असे खोटे सांगून अटक करण्याची धमकी देऊन व डिजिटल आरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून 21 लाख रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

मोबाईल चेक केल्याने मैत्रिणीला दांडक्याने मारहाण!
पिंपरी : मोबाईल मधील काही बाबीवरून झालेल्या वादात तरुणाने मैत्रिणीला शिवीगाळ व मारहाण करून तिच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने ती जखमी झाली. बाणेर येथील सुस रस्त्यावर गुरुवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने (रा. बाणेर, मूळ- खारघर, मुंबई) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कबीर आर्यन गुप्ता (वय 23, रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने आरोपीचा मोबाईल पाहिला असता त्यातील काही बाबी तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला माझ्या रूममध्ये राहू नको असे सांगितले. त्यावरून आरोपीने तिला शिवीगाळ व मारहाण करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

