Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

12 लाख 93 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त; तिघे जेरबंद!

12 लाख 93 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त; तिघे जेरबंद!

पिंपरी : बेकायदेशीरपणे 12 लाख 93 हजार 250 रुपये किंमतीचा 25.865 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करिता जवळ बाळगल्याने तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार सात सप्टेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील अर्धवट तयार ब्रिजवर वाकड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी वंदू दत्तात्रय गिरे पोलीस हवलदार, वाकड पोलीस स्टेशन यांनी फिर्यादी दिली आहे. आबा मल्हारी खलाटे (वय 47, सध्या रा. संत तुकाराम साखर कारखान्याची रूम, कासारसाई, ता. मुळशी, मूळ -रा. मु. पो. खलाटेवाडी, ता. आष्टी, जि. बीड), प्रमोद भीमराव गारुडकर (वय 24, रा. सध्या आव्हाळे यांचा फ्लॅट, मु. पो. आव्हाळेवाडी, ता हवेली, मूळ- रा. मु. पो. वाळुंज, ता.जि. अहिल्यानगर) गोरक्षनाथ शिवाजी वाळके (वय 26, रा. मु. पो. लोणी सय्यद मीर, ता. आष्टी, जि. बी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी 12 लाख 93 हजार 250 रुपये किंमतीचा 25.865 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगला. तसेच ईरटीका कार, मोबाईल असा एकूण 26 लाख 63 हजार 250 रुपये किंमतीचा माल मिळून आला. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"