Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

पितळेच्या माळेला सोन्याचा मुलामा; 10 लाखाची फसवणूक!

पितळेच्या माळेला सोन्याचा मुलामा; 10 लाखाची फसवणूक!

पिंपरी : पितळाच्या माळेला सोन्याचा मुलामा देऊन ते अस्सल सोने असल्याचे भासवत एका व्यक्तीची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जुलै ते एक सप्टेंबर 2026 या कालावधीत बीआरटी रोड वरील मुकाई चौक ते रावेत दरम्यानच्या पादचारी मार्गावर घडला.

याप्रकरणी तुकाराम शिवाजी राठोड (वय 27, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू प्रजापती (वय 35) त्याचा भाचा आणि बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना अर्धा किलो वजनाचा पितळाच्या माळांचा गुच्छ दाखवून तो अस्सल सोन्याचा असल्याचे सांगितले. त्या बदल्यात फिर्यादी कडून दहा लाख रुपये रोख घेतले. प्रत्यक्षात माळा पितळाच्या असून त्यावर सोन्याचा मुलांना दिल्याचे समोर आले आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवले!
पिंपरी : रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिचा विश्वास संपादन करत दोन महिलांनी गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मनी- मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना सोमवार 31 ऑगस्ट दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ममता चौक, दिघी येथे घडली.

याप्रकरणी अविनाश नथू दबडे (वय 40, डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणाबाई दबडे (वय 65) ममता चौकाकडे पायी जात होत्या त्यावेळी दोन महिलांनी त्यांना थांबवून बोलण्यात गुंतवले. त्यानंतर गळ्यातील दीड तोळ्याचे मनी मंगळसूत्र काढून घेतले. त्यांच्या पिशवीत कागदाच्या पुडीत खोटे मणी ठेवून दोघीं तेथून पसार झाल्या. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"