Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी जलतरण स्पर्धा संपन्न!

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी जलतरण स्पर्धा संपन्न!

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी जलतरण स्पर्धा दिनांक ३० ऑगस्ट २०२६,रविवार रोजी डॉल्फिन जलतरण तलाव, चिखली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एसकेएफ,थरमॅक्स,पिसीएमसी,टीकेआयएल,वरसीजंट,नवेक्सेल लॉजिस्टिक्स, क्विनिक्स टेक्नॉलॉजी,जेएसडब्ल्यू,टाटा मोटर्स,फॉरविया,सँडविक एशिया,बजाज ऑटो आकुर्डी,जेड ग्लोबल,जेसीबी,एसएएआर या कंपन्यातील ४५ स्पर्धकांनी भाग घेतला.सदर स्पर्धा सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब द्वारे आयोजित करण्यात आली.

viara vcc
viara vcc

स्पर्धेचे उद्घाटन औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,खजिनदार प्रदीप वाघ व ज्येष्ठ खेळाडू तुषार सुतार यांच्या हस्ते तलावाचे पूजन करून करण्यात आले.याप्रसंगी स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो आकुर्डी),नितीन कदम(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),सचिन कांबळे,मिनार गजने(जेसीबी स्पोर्ट्स कमिटी सदस्य),संतोष शिंदे(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी सदस्य),मंदार कुलकर्णी,रियाज उतावळे,अमित कदम हे उपस्थित होते..

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दुष्यंत गायकवाड (सँडविक एशिया एम्प्लॉईज स्पोर्ट्स क्लब)यांनी केले. स्र्धेचे पारितोषिक वितरण औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,नितीन कदम(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो),दुष्यंत गायकवाड,गिरीश मुळुक,अभय तळदेवकर(सँडविक एशिया एम्प्लॉईज स्पोर्ट्स क्लब सदस्य),सचिन लोहार यांनी केले.याच प्रसंगी यावर्षी ओशेमन जलतरण स्पर्धा (दुबई),जलतरण स्पर्धा (मालवण),नॅशनल मास्टर्स स्विमर्स विनर्स व थायलंड येथे झालेल्या स्पर्धामधील सुवर्णपदक विजेते राजू मासुळकर,गिरीश मुळूक व प्रमोद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.समारंभाच्या शेवटी प्रदीप वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.या संपूर्ण कार्यक्रमाला दुष्यंत गायकवाड,अभय तळदेवकर,सचिन लोहार यांचे साह्य लाभले तर संपूर्ण आयोजनाच्या वेळी राम मासुळकर,गिरीश मुळूक यांनी मोलाचे सहाय्य केले.ही स्पर्धा एकूण ११ गटांमध्ये झाली.या स्पर्धेत महिलांचाही विशेष सहभाग होता.

खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळलेले अनेक ज्येष्ठ खेळाडू व खेळाडूंचे कुटुंबीय उपस्थित होते.या स्पर्धेचे युट्युब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.स्पर्धेचे विजेतेपद “सँडविक एशिया”ने (४६गुण) तर उपविजेतेपद टाटा मोटर्सने(२४गुण) मिळविले.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
१) महिला खुला गट ५० मीटर (फ्रीस्टाइल):-१)नित्यप्रिया घुशी(बजाज ऑटो आकुर्डी)४०ॱ४५ सेकंद,२)वृषाली मगर (फॉरविया) ४५ सेकंद,३)अंजू शिवाप्रसाद(थरमॅक्स)५४.९५ सेकंद. (विशेष पारितोषक नित्यप्रिया घुशी बॅकस्ट्रोक ५५ॱ५३सेकंद.)

१) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (ब्रेस्ट स्ट्रोक):-१)श्रेयस अभ्यंकर (फॉरविया)४०.३५ सेकंद,२)ओंकार पाटील (वरसीजंट)४२ॱ६२ सेकंद,३)सार्थक पाटील (क्विनिक्स टेक्नॉलॉजी)४०.३८ सेकंद.
२) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (बॅकस्ट्रोक):-१) गिरीश मुळूक(सँडविक एशिया)४१ॱ९० सेकंद २)दीपेश पाटील (जेएसडब्ल्यू) ४४.९८ सेकंद,३)ओंकार पाटील(वरसीजंट)४८ॱ०७ सेकंद.
३) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट ५० मीटर (बटरफ्लाय):-१)गिरीश मुळूक(सँडविक एशिया)३८ॱ१६ सेकंद,२)नितेश पाटोळे (सँडविक एशिया)४८.९० सेकंद,३) यश शुक्ला(बजाज ऑटो आकुर्डी)५२.१९ सेकंद.
४) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (फ्रीस्टाइल):-१)गिरीश मुळूक(सँडविक एशिया)२९ॱ१० सेकंद,२)ओंकार पाटील(वरसीजंट)३४ॱ२९ सेकंद,३)दीपेश पाटील(जेएसडब्ल्यू)३४.३४ सेकंद.
५) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (फ्रीस्टाइल):-१)उदय खरसन(जेड ग्लोबल)३३.०१ सेकंद,२)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स)३६.३२ सेकंद,३) महादेव गायकवाड(टाटा मोटर्स)४१.३७ सेकंद.
६) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (ब्रेस्ट स्ट्रोक):-१)उदय खरसन(जेड ग्लोबल)४१ॱ५६ सेकंद,२)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स) ४३.६० सेकंद,३)तुषार खोत (सँडविक एशिया)५०.४५ सेकंद.
७) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (बॅकस्ट्रोक):-१)लक्ष्मीकांत पवार(टाटा मोटर्स)५५ॱ२९ सेकंद २)संदीप पाटील(सँडविक एशिया)१ मिनिट ०२ सेकंद३) उदय खरसन(जेड ग्लोबल)४४.९४ सेकंद.
८) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (बटरफ्लाय):-१)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स) ४२.२८ सेकंद,२) महादेव गायकवाड(टाटा मोटर्स)५२ॱ७६ सेकंद,३)तुषार खोत(सँडविक एशिया)५४.८३ सेकंद.
९) पुरुष रिले ४ x ५० मीटर ४५ वर्षाखालील गट:-१)सँडविक एशिया २ मिनिट ५२ सेकंद,(गिरीश मुळूक,महेश चाकणे, निलेश पाटोळे,प्रवीण गुरव),२)एसकेएफ ३ मिनिट २२ सेकंद(महेश जावळे,सौरभ पाटील,अजय चव्हाण,गणेश यादव) ३) सँडविक एशिया ३ मिनिट ४३ सेकंद(युवराज पाटील,सुरेश बर्गे,रोहित पोवार,रवी खोत)
१०) पुरुष रिले ४ x ५० मीटर ४५ वर्षावरील गट:-१)टाटा मोटर्स ३ मिनिट १४ सेकंद (महादेव गायकवाड,लक्ष्मीकांत पवार,मुकुंद शेळके,प्रमोद साळुंखे)२)सँडविक एशिया ३ मिनिट २० सेकंद(सतीश जाधव,तुषार खोत,संदीप पाटील, विजय परदेशी.)

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"