Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

31st October 2026
पिंपरी-चिंचवड

चिखली जलशुद्धीकरण वीजप्रणाली जोडणीसाठी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरवारी बंद!

चिखली जलशुद्धीकरण वीजप्रणाली जोडणीसाठी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा गुरवारी बंद!

पिंपरी : चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे नविन २०० द.ल.ली. क्षमतेचा नवीन प्रकल्प काम सुरु असून, या प्रकल्पाकरिता उच्चदाब वीज पुरवठा करण्यासाठी, दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी उच्चदाब केबल वीजप्रणालीत जोडणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्युतविषयक कामे करताना कामगारांच्या व यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कालावधीत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करणे आवश्यक आहे. सदरचे काम दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी करताना सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे बंद करणेमुळे, चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती सह शहर अभियंता (पा.पु.) यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

त्यामुळे दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी शहरातील बो-हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, च-होली, डुडुळगाव, चोवीसावाडी व इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असुन दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.०४/०९/२०२६ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

नमूद परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते कि, मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करावा .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"