Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मध्ये मनाई आदेश!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मध्ये मनाई आदेश!

पिंपरी : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी 31 ऑगस्ट रोजी हा आदेश निर्गमित केला आहे.

viara vcc
viara vcc

2 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री बारा वाजले पासून 15 सप्टेंबर 2026 पर्यंत म्हणजे 14 दिवस हा आदेश लागू राहणार आहे. आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दांडे, शस्त्र-,सुरे, कोयते, तलवारी, दंड, काठ्या, बंदूक अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगणे किंवा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच व्यक्तींचे किंवा नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे चित्रे अथवा प्रतिमा यांचे प्रदर्शन व दहन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

टेम्पो चालकाला अडवून मारहाण!
पिंपरी : कंपनीतून माल भरून मोशी कडे जाणाऱ्या टेम्पो चालकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. ही घटना शनिवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मोई गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंदिराजवळ मोई रोडवर घडली.

याप्रकरणी सुरज गोपाळ तोरे (वय 23, रा. चिखली, मोरे वस्ती, मूळ- रा. गारोळा, ता. चाकूर, जि. लातूर) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आपल्या ताब्यातील गाडीत कंपनीतून माल भरून मोशी येथे जात होते. भैरवनाथ मंदिराजवळ तिघांनी त्यांची गाडी अडवली. त्यातील एकाने फिर्यादीला गाडीतून खाली उतरण्यास सांगून मारहाण केली. जिथून गाडी भरली तिथेच खाली कर असे सांगत शिवीगाळ व दमदाटी केली. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"