Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

पीएमआरडीएची बनावट प्रमाणपत्राद्वारे फसवणूक!

पीएमआरडीएची बनावट प्रमाणपत्राद्वारे फसवणूक!

पिंपरी : रस्त्यांचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्र सादर करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक करण्यात आली. ही घटना 17 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता ज्ञानोबा चौरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेसर्स एसपीडी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शहाजी पांडुरंग देवकर (रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, मजाक इंडिया, पिंपळे जगताप ते करंदी फाटा जोडणारा रस्ता आणि सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत आरोपीने बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यांची तीन बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्रे तयार केली. मूळ रकमेत फेरफार करून ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवत ऑनलाइन निविदा प्रक्रियेत वापरून पीएमआरडीए कार्यालयाची फसवणूक केली. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"