Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
गुन्हेगारी

सव्वा सहा वर्षाच्या चिमूरड्यावर अत्याचार: तरुणाला अटक

सव्वा सहा वर्षाच्या चिमूरड्यावर अत्याचार: तरुणाला अटक

पिंपरी : सव्वा सहा वर्षाच्या चिमूरड्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जुलै ते आज पर्यंत इंद्रायणी नगर, आळंदी देवाची, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी राजा शिवनारायण ठाकूर (वय 30, k ऑफ कुरुंद यांची खोली मध्ये भाड्याने इंद्रायणी नगर, आळंदी देवाची, मूळ गाव- मु. पो. वार्ड नंबर पाच, सनीचरा ,जि. दरभंगा, बिहार) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष विजय सुकाळे (वय 19, रा. इंद्रायणी नगर, आळंदी देवाची, ता. खेड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी यांचा मुलगा (वय सहा वर्ष तीन महिने) यास घरामध्ये बोलावून त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलगा अत्याचारामुळे ओरडला असता त्याचे तोंड दाबून धरायचा. याशिवाय अश्लील वागणूक केली. कोणास काही सांगितले तर मारण्याची धमकी चिमुरड्याला दिली. पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी फिर्यादीला देखील धमकी दिली. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंगारे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"