Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
पिंपरी-चिंचवड

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 4 दिवस शिल्लक!

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 4 दिवस शिल्लक!

पिंपरी : शहरातील मतदारांबरोबरच मोठ्या औद्योगिक संस्था प्रमुख,शहरातील सनदी अधिकारी, शासकीय उच्च पदस्थ अधिकारी,नामवंत उद्योगपती, मिडीया यांचे प्रतिनिधी,पत्रकार, न्यायाधिश, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणेबाबत’विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत आहे.

viara vcc
viara vcc

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २०५ चिंचवड विधानसभा,२०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा व २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यानुसार दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत बीएलओ (BLO) यांचेमार्फत ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) चे वाटप व स्वीकृतीचा कालावधी आहे. मा भारत निवडणूक आयोगाने दि. ०४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार पुढील प्रमाणे सुधारित कार्यक्रम दिला आहे…

मोहिमेचे सुधारित वेळापत्रक
1). ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ – बीएलओ (BLO) मार्फत ‘EF फॉर्म’ चे वाटप व स्वीकृती.
2). २४ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी.
3)२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ – प्रारूप यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.
4)०५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ – दावे व हरकतींवर नोटीस बजावणी आणि सुनावणी.
5.) २७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.

    “या कार्यक्रमा अंतर्गत ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) वाटप व स्वीकृतीचा कालावधी फक्त ५ दिवस शिल्लक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तीनही मतदार संघातील ज्या मतदारांनी ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) भरून संबंधित बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना दिला नसेल वा ज्या मतदारांचा बीएलओ (BLO) यांचेशी अद्याप संपर्क झाला नसेल अश्या सर्व मतदारांनी लवकरात लवकर आवश्यक ती माहिती व कागदपत्रासह ‘EF फॉर्म’ (गणना पत्रक) भरावे.” असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच शहरातील मतदारांबरोबरच मोठ्या औद्योगिक संस्था प्रमुख,शहरातील सनदी अधिकारी, शासकीय उच्च पदस्थ अधिकारी,नामवंत उद्योगपती, प्रेस मिडीया,इलेट्रॅानिक मिडीया यांचे प्रतिनिधी,पत्रकार ,न्यायाधिश, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती यांची नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे यासाठी मोबाईलमध्ये ECINET ऍप डाउनलोड करुन नजिकच्या मतदान नोंदणी अधिकारी तसेच संबंधित बीएलओंशी संपर्क करणे आवश्यक आहे. तसेच आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in, https://voters.eci.gov.in, वेबसाईटवर अधिक माहिती आहे.

    Written By
    टिम फक्त मुद्द्याचं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Home
    Email
    Search
    × Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"