Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

29th October 2026
गुन्हेगारी

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना केली अटक !

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना केली अटक !

पिंपरी : गांजा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बुधवार 5 ऑगस्ट रोजी अजंठानगर निगडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी गोविंद डोके पोलीस शिपाई यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल विलास शिगवण (वय 34), प्रशांत रावसाहेब बनसोडे (वय 23, दोघेही रा. निगडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी आरोपी अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी अजंठानगर, निगडी परिसरात आले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन 530 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार;तरुणावर चाकूने हल्ला!
पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला .ही घटना याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागेश प्रकाश रेड्डी (वय 32, रा. देहूरोड), यांनी फिर्याद दिली आहे. अनिल ओमकार, हमीद इस्माईल शेख (वय 30, रा. गांधीनगर, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारू पिण्यासाठी फिर्यादीकडे पैसे मागितले मात्र पैसे न दिल्यामुळे आरोपींनी मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गांधीनगर येथे गेले असता आरोपीने चाकूने डाव्या हाताच्या पंजावर व पाठीवर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"