Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

पिंपरी कॅम्पात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवत दुकानातून रोकड चोरी !

पिंपरी कॅम्पात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवत दुकानातून रोकड चोरी !

पिंपरी : पिंपरी कॅम्पातील चॉईस व्हरायटी दुकानात भर दुपारी तीन जणांनी घुसून कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली आणि दुकानातील तीस हजार रुपये रोख रक्कम, पूजेची पितळी नाणी घेऊन पोबारा केला. ही घटना रविवार 26 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चॉईस व्हरायटी या दुकानात ब्लॉक नंबर 22/16, भवानी बॅग समोर, कपडा मार्केट, रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी हर्ष प्रदीप पागराणी (वय 21, रा. फ्लॅट नंबर इ- 302, सुखवानी कॅसल, वैभवनगर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तीन अज्ञात बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका अज्ञात बालकाला ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोन फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी कॅम्प परिसरातील चॉईस व्हरायटी या दुकानात दुपारच्या साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती हातात कोयते घेऊन दुकानात घुसले. प्रथम त्यांनी हप्ता म्हणून रकमेची मागणी केली आणि कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील 30 हजार रुपये रोख रक्कम, पूजेची पितळी नाणी व गुरु लीलाशाबाबा यांचा फोटो बळजबरीने चोरून नेला. फिर्यादी यांनी या चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता फायटर सारख्या हत्याराने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. शेजारील अन्य दुकानदार मदतीस आले आसता त्यांना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून कोणी मध्ये आल्यास त्यांचे तुकडे करू अशी धमकी दिली आणि मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. यामुळे अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"