ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक!

पिंपरी : माझ्याकडे पैसे गुंतवा तुम्हाला बँकेपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के प्रमाणे परतावा देतो असे आमीष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत वराळे ,ता. मावळ येथे फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.

याप्रकरणी दिलीप नारायण वडेलकर (वय 70, रा. बी.5, रूम नंबर 208, कोहिनूर बिगोनिया, वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मनोज गोपाळ देसले (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे ,मूळ- रा. जुने मोहिंदे, नंदुरबार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीला तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा मी तुम्हाला बँकेपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के प्रमाणे परतावा देतो असे सांगून वेळोवेळी चेक, यूपीआय व रोखीने असे एकूण 9 लाख 70 हजार रुपये घेऊन फिर्यादीस जादा परताव्याचे आमीष दाखवून रकमेचा परतावा न देता व फिर्यादीची रोख रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोवारकर हे तपास करत आहेत.

