Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चार आरोपींना अटक ;14 तोळे सोने जप्त!

घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चार आरोपींना अटक ;14 तोळे सोने जप्त!

उत्तर माळुंगे एमआयडीसी गुन्हे शोध पथकाची कामगिरी
चाकण : भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा गाळा बंद असताना अज्ञात चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून भाजी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत महिलेच्या दुकानातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सहा फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे दोन वाजता घडली. याबाबत उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी चार महिन्यानंतर बिहार मधील चार आरोपींना मुंबई व बेंगलोर येथून जेरबंद केले आहे.

viara vcc
viara vcc

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निक्की निक्कू कुमार देवकी सिंग (वय 22, ब्लॉक भाऊ थाना, जि. चितामढी, बिहार), रंजनकुमार देवकी सिंग (वय 20, रा. ब्लॉक भाऊ थाना, जि. सीतामढी, बिहार), राजकुमार उर्फ प्रिन्स कुमार विजय पासवान (वय 19, पत्ता -देहरी, ओनसना बाग, विजय पासवान बाग, रोहतास, बिहार), डिंपल पटेल विनोद सिंग (वय 26, रा. मेसेज थाना, कुदरा, जि. केमल बहुवा, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्वेता खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे महाळुंगे इंगळे ता. खेड येथे राहणाऱ्या सौ कविता मदन कड या भाजी विक्री करून त्याच ठिकाणी रहात होत्या. दुकानाचा गाळा बंद करून यात्रेकरिता मूळ गावी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून चोरी केली. शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला. मात्र आरोपी बाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. तपास पथकातील पोलिस संतोष काळे व शुभम खंडागळे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत दोन संशयित व्यक्तींची माहिती मिळाली .त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा तिसरा साथीदार रिंकू सिंग हा चोरीचे सर्व दागिने घेऊन मूळ गावी सीतामढी, बिहार येथे पळून गेल्याचे सांगण्यात आले.

तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व पथक यांनी गुन्हा घडल्यापासून सतत चार महिने पाठपुरावा करत विविध अंगाने तपास करून तांत्रिक विषयक विश्लेषणाच्या आधारे रंजनसिंग यास मुंबई येथून व निकुशिंग यास बेंगलोरु येथून ताब्यात घेतले. पोलीस कस्टडीतील तपासात आरोपींनी मूळ गावी बिहार येथे सोन्याचे दागिने लपवल्याची कबुली दिली. बिहार सीतामढी येथे पोलीस पथकाने आरोपी सहजाऊन एकूण 12 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

ही कारवाई पोलीस पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग श्रीमती प्रिया डमाळे, उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोनकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, मंगेश कदम, हरी रणदिवे, मंगेश घोलप, साईल सांडभोर, समीर महात तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 यांचे कार्यालय कडील सहाय्यक फौजदार तुकाराम घुगे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"