Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

1st November 2026
गुन्हेगारी

तंदूरच्या जेवणाचे पैसे मागितल्याचा राग;कर्मचाऱ्यांना मारहाण!

तंदूरच्या जेवणाचे पैसे मागितल्याचा राग;कर्मचाऱ्यांना मारहाण!

पिंपरी : हॉटेलमध्ये तंदूरच्या जेवणाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत दरमहा दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 18 जुलै रोजी मध्यरात्री काळेवाडीतील नढे नगर येथील महेश रेस्टॉरंट अँड बार समोर घडली.

viara vcc
viara vcc

महेश पोपट नढे (वय 29, नढे नगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतीक उर्फ बबऱ्या गोरख भराटे (वय 23, रा. मिलिटरी कॅम्प, दिघी), रोहित मानसिंग राठोड (वय 20, रा.नढे नगर, काळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी तंदूरच्या जेवणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ केली. आम्ही जेलमधून सुटून आलो आहोत. हॉटेल चालवायचे असेल तर महिन्याला दहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून त्यांना जखमी केले. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"