Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

4th November 2026
गुन्हेगारी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून!

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून!

पिंपरी :पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवार 17 जुलै रोजी चाकण येथील साईनगरी परिसरात घडली.

मकबूल उस्मान नदाफ (वय 52, रा.वाकी ) मुलीच्या वडिलांनी उत्तर चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी बडीमा रफिक पठाण (वय 27 )हिचा विवाह रफिक मेहमूद पठाण (वय 32) यांच्याशी करण्यात आला. पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन आरोपी पती रफिक याने राहत्या घरात मिक्सरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानुसार आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

जागेच्या जुन्या वादातून कोयत्याने हल्ला!
पिंपरी : जागेच्या जुन्या वादातून चौघांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना देहू गावातील अंगणवाडी परिसरात घडली. याप्रकरणी बाळाजी लक्ष्मण जगताप (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे.

केतुल उर्फ भैय्या संतोष भोसले (वय 25), आकाश संतु दुटे (वय 25), अश्रुबा गायकवाड (वय 26), छाया संतु दुटे (वय 45)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर केतुल भोसले याने कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी ही लाथाबुक्क्यांनी व दांडक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"