Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

डॉक्टर तरुणीने 24 व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या!

डॉक्टर तरुणीने 24 व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या!

पिंपरी : एका डॉक्टर तरुणीने रावेत येथील बांधकामामधील 24 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी रावेत येथे घडली. श्वेता तुळशीराम रोकडे (वय 29, रा. सेलेस्टीयल सोसायटी, रावेत) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्वेता या व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्या रावेत येथील सेलेस्टीयल सोसायटीमध्ये मैत्रिणी सोबत राहत होत्या. शुक्रवार तीन जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जवळच सुरू असलेल्या ऑस्ट्रिया रॉयल्स या 24 मजली बांधकामा मधील इमारतीमध्ये गेल्या. काही वेळानंतरच इमारतीवरून एक महिला खाली पडल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी महिलेच्या डोळ्यावर झोपताना वापरले जाणारे आयमास असल्याचे समोर आले आहे.

सुरुवातीला महिलेची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली असता फुटेजच्या आधारे मृत महिला श्वेता रोकडे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर पोलिसांनी श्वेता राहत असलेल्या घराची झडती घेतली. मात्र तेथे कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. महिलेच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. रावेत पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"