Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जून अखेर ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

पिंपरी : महानगरपालिकेच्या विविध विभागांत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने सेवा बजावत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जडणघडणीत तसेच शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे,त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल महापालिकेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी त्यांचा सत्कार करत त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

viara vcc
viara vcc

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान समारंभात जून २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे ४२ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलेले १५ अशा एकूण ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे,मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल,नंदकुमार इंदलकर,विविध विभागांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

जून २०२६ मध्ये नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता सुदर्शन वहीकर, उपअभियंता विद्युत श्यामसुंदर बनसोडे, प्रशासन अधिकारी जयवंत निरगुडे, असिस्टंट मेट्रन प्रतिभा नाईकरे, मुख्याध्यापक निर्मला खुडे, सायराबानू शिकलगार, सुनंदा कोंडे, विजया ढमाले, आशा निचळ, बाळुबाई माळी, स्नेहला मोरे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) अनिल झोडे, शामसुंदर भंडारी, उपशिक्षक मीना पवार, रफियासुल्ताना सय्यद, अय्याज मोमीन, विजया भूतकर, संगीता पाटील, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, फिटर पद्माकर सावंत, वायरमन रोहिदास गोळे, वॉर्ड बॉय तानाजी दुदुस्कर, हनुमंत सोनवणे, रखवालदार दामू मुठे, हंबीर बवले, राजेंद्र पवार, शिपाई पंडीत साखरे, मजूर शंकर देवकर, बाळासाहेब कडू, सुरेश फुगे, सुनिल बहिरट, रामदास जाधव, रामअवध गोड, शंकर नवरंग, रमाकांत सुर्वे, संजय असवलीकर, मधुकर सुतार, नाईक बाळा पवार, स्प्रे कुली पांडुरंग डामसे, सफाई कामगार संभाजी गोरखे, मृणालिनी रणपिसे तसेच गटरकुली मल्हारी अवतारे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगार मंतोष जगताप, रविंद्र शिंदे, पारुवाई बचुटे, अलका खेंग्रे, मुनिता जाधव, लता कंडारा, लक्ष्मी घोडेस्वार, मुदलीयार मोतीराम,निशा नेटके,अनिता बनसोडे , सुनिता साळवे, स्प्रे कुली दत्तात्रय बालघरे, सफाई सेवक प्रभाकर वाघमारे आणि गटरकुली दाजी करवंदे,रमेश हेंद्रे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार मुख्य लिपिक माया वाकडे यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"