Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

सराईत आरोपींकडून दोन पिस्टल जप्त; दोघे जेरबंद!

सराईत आरोपींकडून दोन पिस्टल जप्त; दोघे जेरबंद!

पिंपरी : घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना या आदेशाचे उल्लंघन करून दोन सराईत आरोपींनी दोन पिस्टल जवळ बाळगल्याने अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवार 29 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल न्यू डायमंड समोर, सोमाटणे फाटा ,तालुका मावळ येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अजिनाथ राणे पोलीस शिपाई गुन्हे शाखा युनिट दोन यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पप्पू उर्फ विनोद राकेश पवार (वय 26, रा. बुद्ध विहारा समोर दत्तनगर, चिंचवड) आणि रोहन सिताराम सावंत (वय 24, रा. दत्त मंदिराशेजारी दत्तनगर, चिंचवड )अशी सराईत अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध आहे. तरी देखील वरील आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन करून तळेगाव वरून देहूरोड कडे जाणाऱ्या रोडवर न्यू डायमंड समोर, सोमाटना फाटा येथे आरोपी क्रमांक एक याने एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस आणि आरोपी क्रमांक दोन याने एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे आढळून आले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली आहे .तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहारे हे तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"