राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेली ट्रॅव्हल बस पाबे घाटात दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू

पुणे : राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेली पर्यटकांची ट्रॅव्हल बस वेल्हे तालुक्यातील पाबे घाटातील खोलदरीत रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

विश्वास बाबुराव साथीम (वय 25), ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय 23) या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका खाजगी कंपनीतील 22 जण खाजगी बस मधून राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाले होते. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वेल्हे तालुक्यातील पावे घाटातील तीव्र वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस घाटातील संरक्षक कठड्यावर आढळली. संरक्षक कठडा तोडून बस उलटून दरीत कोसळली .दरीतील झाडावर बस अडकली.बस दरीत कोसळल्यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले होते.
वेल्हे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते पोलीस कर्मचारी निलेश राणे, आकाश पाटील ,पंकज मोघे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तानाजी भोसले,, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर ,कृष्णा मरगळे यांनी मदत कार्य करून बसमध्ये अडकलेल्या जखमींना दरीतून बाहेर काढले.

