अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल जप्त!

चाकण : घातक शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगण्यास प्रतिबंधक आदेश असताना अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शुक्रवार 26 जून रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
शिवाजी दत्तात्रेय लोखंडे पोलीस शिपाई यांनी तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित अल्पवयीन मुला विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे व सुमारे 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे तपास करत आहेत.

जमिनीच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार;वाहनांची तोडफोड!
पिंपरी : भाऊबंदकीच्या जमिनीच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार 26 जून रोजी पहाटे एक वाजता (मोई ,ता. खेड) येथे ही घटना घडली.
याप्रकरणी सुरेश विष्णू गवारी (वय 60. रा.मोई, ता. खेड) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचा चुलत नातू आशिष गवारी (वय 21, रा. बिजलीनगर, चिंचवड) व अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊबंदकीच्या जमीन वादातून फिर्यादीचा चुलत नातू याने (मोई ता. खेड) येथे जाऊन वाहनांची तोडफोड करून पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोगले तपास करत आहेत.

