जॉब मिळवून देण्यासाठी प्रभावी जॉब प्रोफाइल बनवून देण्याच्या आमिषाने फसवणूक!

पिंपरी : कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी प्रभावी जॉब प्रोफाइल बनवून देण्याचे आमिष दाखवून व खोटे इंटरव्यू घेऊन एका व्यक्तीची एक लाख 72 हजार 200 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. ही घटना 19 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर 2025 या दरम्यान लिंकड इन सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन पद्धतीने फिर्यादीच्या राहत्या घरी करण्यात आली.

याप्रकरणी एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गौरव शर्मा (अनोळखी व्यक्ती) व्हाट्सअप नंबर धारक, आर कुमार एस नावाने असलेला अकाउंट धारक व आयएफसी नंबर धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी लिंकड इन सोशल मीडिया द्वारे व व्हाट्सॲप नंबर वरून फिर्यादीशी संपर्क साधला. पे पाल (pay pal) कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी प्रभावी जॉब प्रोफाइल बनवून देण्याचे आमीष दाखवून त्यानंतर खोटे इंटरव्यू घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीस पूर्वीचे विप्रो कंपनीने भारतात डायरेक्टर मीटिंगसाठी बोलावून जॉब वरून काढून टाकल्याने त्याचे राहण्यासाठी व दैनंदिन फॅमिलीच्या उदरनिर्वासाठी पैशाची खूप आवश्यकता असल्याचे खोटे सांगून विश्वासघात करून एक लाख 72 हजार दोनशे रुपये करूर वैश्य बँकेच्या आर कुमार एस नावाने असलेल्या अकाउंट नंबर वर ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर हे तपास करीत आहेत.

