नाशिक मध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीते विजयी ; शिवसेनेला धक्का

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल जाहीर करण्यात आला असून 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. मात्र नाशिक मध्ये भारतीय जनता पक्षाने बंडखोर गोकुळ गीते यांना विजयी केल्याने शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे .शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपने आम्ही 12 जागा जिंकणार या उद्देशाने निवडणूक लढवून नाशिक मध्ये बंडखोरी घडवून आणून उमेदवार विजयी करून आणला. यामुळे आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सावध होण्यासाठी ही एक संधी दिली आहे अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे.

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक पार पडली निवडणुकी आधीच 17 पैकी सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते .त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला आहे नाशिक आणि जळगाव या दोन ठिकाणी अनुक्रमे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने बंडखोरी केली होती. . निवडणुकीच्या अगोदर बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले .जळगाव येथील शिवसेना उमेदवार काळे यांनी इमानदारीत .माघार घेतली तर भाजपने नाशिक मध्ये मात्र शिंदे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने शिंदे शिवसेनेत असंतोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने फसवणूक केल्याची चर्चा सध्या सुरू आहे .नाशिक मध्ये बंडखोर अपक्ष गोकुळ गीते यांना 357 .शिवसेना नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली त्यामुळे 109 मतांनी बंडखोर गोकुळ गीते यांचा दणदणीत विजयी झाले.
बिनविरोध विजयी उमेदवार
ठाणे – रवींद्र फाटक शिवसेना , यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना ,- रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस , पुणे – विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस , वर्धा – गडचिरोली ,चंद्रपूर -अरुण लखानी भाजप , अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे भाजप
विजयी उमेदवार
छत्रपती संभाजीनगर, जालना -सुहास शिरसाट भाजप, नाशिक- गोकुळ गीते भाजप बंडखोर , भंडारा-गोंदिया, अविनाश ब्राह्मणकर भाजप, सांगली, सातारा – धैर्यशील कदम भाजप, परभणी, हिंगोली – सईद खान शिवसेना, सोलापूर -राजेंद्र राऊत भाजप, धाराशिव, लातूर ,बीड – बसवराज पाटील भाजप , अमरावती -प्रवीण पोटे भाजप , नांदेड – अमर राजूरकर भाजप अशी विजयी झालेल्या उमेदवारांची नावे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने 12 जागा लढवण्यासाठी आग्रह धरला होता त्यात शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा देण्याचे मान्य केले होते परंतु शिवसेनेने ताणून धरल्याने त्यांना नाशिकची जागा देण्यात आली परंतु भाजपने आम्ही 12 जागा जिंकणार या उद्देशाने निवडणूक लढवून नाशिक मध्ये बंडखोरी घडवून आणून उमेदवार विजयी करून दाखविला. यामुळे आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सावध होण्यासाठी ही एक संधी दिली आहे अशी चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे