3 लाख 64 हजार रुपये किंमतीच्या स्क्रॅप मालाचा अपहार!

पिंपरी : एस बी ए मेटल अँड स्टील प्रा लिमिटेड कुरुळी यांनी 20.380 मॅट्रिक टन सीआरसीए स्क्रॅप कोरस इंडिया लिमिटेड (पेपको फाउंड्री) भोसरी येथे पाठवले असता त्यातील 3 लाख 64 हजार रुपये किंमतीचा सात मॅट्रिक टन मालाचा परस्पर अपहार केला. ही घटना 26 मे 2026 रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास कोरस इंडिया लिमिटेड एमआयडीसी भोसरी येथे घडली.

या प्रकरणी असलम बशीर शेख (वय 40, रा. अल्मस मंजिल, दत्तनगर, थेरगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास माणिक लाटे (रा देहुगाव), संतोष लाटे (रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुळी तालुका खेड येथील एसबीए मेटल अँड स्टील प्राइवेट लिमिटेड यांनी दहा लाख 58 हजार 129 रुपये किंमतीचा 20.380 मेट्रिक टन सीआरसीए स्क्रॅप भोसरी एमआयडीसी येथील कोरस इंडिया लिमिटेड (पेपको फाउंड्री) येथे पाठवला होता. परंतु आरोपींनी 20.380 मेट्रिक टनापैकी पेपको फाउंड्री मध्ये 13 मेट्रिक टन माल खाली केला आणि उर्वरित सात मेट्रिक टन 3 लाख 64 हजार किंमतीचा स्क्रॅप मालाचा परस्पर अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शेलार हे तपास करत आहेत.

