फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
गुन्हेगारी

अवैधरित्या घरगुती गॅस रिफिलिंग; एकास अटक!

अवैधरित्या घरगुती गॅस रिफिलिंग; एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून तो छोट्या गॅस टॅंक मध्ये रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार दिनांक 11 जून रोजी रात्री करण्यात आली.

गजानन रामराव पौळ (वय 45, रा. चिंबळी, ता. खेड, मूळ – परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमित ढिकळे पोलीस शिपाई, यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने विनापरवाना घरगुती सिलेंडर मधील गॅस रिफिलिंग सर्किटच्या साह्याने छोट्या चार किलोच्या टाक्यांमध्ये भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले. आरोपीकडून 30 हजार 400 रुपयांचा अवैध गॅस साठा व रिफिलिंग साठी करण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल अधिक तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तडीपार आदेशाचे उल्लंघन; गुंडास अटक!
पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका गुंडाला पोलिसांनी हत्यारासह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार 11 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोशी टोल नाका येथे करण्यात आली.

गुंडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गिरी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशिष प्रकाशराव शेळके (वय 27, रा .मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला परिमंडळ तीन मधून तडीपार करण्यात आले होते .आरोपीने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला .आरोपी मोशी टोलनाक्याजवळ 500 रुपये किंमतीचा लोखंडी कोयता बाळगून फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"