फक्त मुद्द्याचं!

10th June 2026
गुन्हेगारी

तंबाखूजन्य व सुगंधी पान मसाला विक्रीसाठी साठवणूक ; एकास अटक!

तंबाखूजन्य व सुगंधी पान मसाला विक्रीसाठी साठवणूक ; एकास अटक!

पिंपरी : सुगंधी तंबाखू ,गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुपारी असे अन्नपदार्थ विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध असताना तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी पान मसाला विक्रीसाठी साठवणूक केल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अन्य चार व्यक्तींविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सोमवार आठ जून रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र टेकाळे यांच्या तळमजल्यावरील खोली लेन नंबर सहा, आनंदवन सोसायटी ,थेरगाव येथे कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc

आफनान अब्दुल कादिर शेख अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे, पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. किशोर लहू लोंढे (उर्फ कुमार लोंढे, वय 32, रा. आनंदवन सोसायटी, लेन नंबर सहा ,थेरगाव ),अमोल लहू लोंढे (वय 36, आनंदवन सोसायटी, थेरगाव), राजेंद्र किसन टेकाळे (घरमालक भाडेकरारनुसार), रुस्तमखान (गुप्त माहितीनुसार), बाबर खान (गुप्त माहितीनुसार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून किशोर लहू लोंढे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सुगंधी तंबाखू, गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण किंवा विक्री यावर वीस जुलै 2025 पासून एक वर्षासाठी बंदी घातलेली आहे. हा प्रतिबंधक आदेश झुगारून आरोपी यांनी 8 लाख 37 हजार 109 रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी पान मसाला विक्रीसाठी साठा केल्यामुळे हे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"