फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
गुन्हेगारी

दोन लाखाचा गुटखा वाकड येथे जप्त; एकास अटक!

दोन लाखाचा गुटखा वाकड येथे जप्त; एकास अटक!

पिंपरी : वाकड येथील कस्पटेवस्ती रोड परिसरात शासन बंदी असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवार आठ जून रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास करण्यात आली.

viara vcc
viara vcc

पोलीस शिपाई ज्ञानदेव झेंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार किरणसिंग मोहनसिंग सोळंकी (वय 32, रा. वाकड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटेवस्ती येथील लक्ष्मी मोटर्सच्या मागे असलेल्या पत्र्याच्या खोलीत आरोपीने आरोग्यास अपायकारक गुटखा आणि पान मसाला लपवून ठेवला होता. पोलिसांनी छापा टाकून दोन लाख आठ हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तीन लाखाची सायबर फसवणूक!
पिंपरी : क्रेडिट कार्ड आणि यूपीआयची गोपनीय माहिती वापरून वाकड येथील एका तरुणाची तीन लाख 12 हजार 526 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना दोन ते पाच जून दरम्यान घडली आहे .रणवीर अरविंद कुमार वर्मा (वय 28, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन (रा. फरीदाबाद, हरियाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ऑनलाइन पद्धतीने दोन महागडे मोबाईल फोन खरेदी केले. तसेच यूपीआय आयडीचा वापर करून खात्यातून पैसे वळवून तीन लाख 12 हजार 526 रुपयांची फसवणूक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"