फक्त मुद्द्याचं!

9th June 2026
गुन्हेगारी

बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री करता वाहतुक: आरोपी अटक

बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री करता वाहतुक: आरोपी अटक

पिंपरी : बेकायदेशीरपणे विदेशी दारू टोयोटा कंपनीच्या इनोव्हा गाडीतून विक्री करता नेत असताना पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रविवार 7 जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास वल्लभनगर ते नेहरूनगर रोडवर, महादेव ट्रेडिंग कंपनीच्या समोर, संत तुकाराम नगर येथे करण्यात आली.

याप्रकरणी भागवत अंकुश गायकवाड पोलीस शिपाई संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रोहित गोपाळ सुगावे (वय 22, रा. नखाते वस्ती, घर नंबर दोन, किनारा कॉलनी, रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या ताब्यातील टोयोटा कंपनीच्या इनोव्हा वाहन क्रमांक (एम एच 12, के ई .0095 ) मधून बेकायदा विनापरवाना 86 हजार 220 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या शिलबंद बाटल्या प्रोव्हिबिशन माल जवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आला. पोलिसांनी इनोव्हा कार व विदेशी दारू जप्त केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे रजपूत हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

भरधाव टेम्पोच्या धडकेने एकाचा मृत्यू!
पिंपरी : पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन मरण पावला. ही घटना 25 मे रोजी महाळुंगे- नांदे रोड, रिवेरा सोसायटीच्या गेट समोर घडली. सोनपाल कन्हेलाल चौधरी (वय 23) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी मेवालाल वर्मा (वय 50, रा. लेबर कॅम्प हिलसाइड ,महाळुंगे, ता. मुळशी, मुळगाव -भैरमपूर, पो. वारिया, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (एम एच, 12, एस एक्स/ 79 44) या टेम्पो वरील चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे जावई सोनपाल कन्हैयालाल चौधरी (वय 23) हे पायी रस्ता ओलांडत असताना टेम्पो क्रमांक एम एच बारा एस एक्स 79 44 वरील चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व हयगईने इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल असे वाहन चालवून सोनपाल चौधरी यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बत्तीशे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"