खासगी विमा कंपनीत महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ: एकास अटक!

पिंपरी : एका खाजगी विमा कंपनीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करून तिला पदोन्नतीचे आमीष दाखवत अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीतील क्षेत्रीय व्यवस्थापकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने एक जून रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला औंध येथील एका विमा कंपनीत कार्यरत आहे. संशयित सय्यद हा त्याच कंपनीत क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम करतो.
19 मे रोजी औंध येथे तसेच 29 मे रोजी क्लाइंट भेटीचे कारण सांगून त्याने पीडित महिलेला हिंजवडी येथून लोणावळा येथे नेले. तेथे पदोन्नतीचे आमीष दाखवत तिचा लैंगिक छळ केला आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. कार्पोरेट व्यवसायात वरिष्ठांना खुश ठेवावे लागते तसे केल्यास तुझे प्रमोशन करेल असे सांगून संशयिताने पीडितेचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रारीत नमूद केली आहे .पिडीतेने प्रसंगावधान राखत गाडीतील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आहे .दरम्यान महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

