फक्त मुद्द्याचं!

4th June 2026
पिंपरी-चिंचवड

फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील अनधिकृत दारु विक्री शेडवर निष्कासन कारवाई!

फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील अनधिकृत दारु विक्री शेडवर निष्कासन कारवाई!

विषारी दारूची विक्री केलेल्या शेडवर कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

viara vcc
viara vcc

उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली. कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता उमेश मोने, उपअभियंता संदिप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनिल दांगडे, सुनिल हरिदास तसेच कनिष्ठ अभियंते सतीश डांगे, अशोक पाटील, वनिता बवले, योगेश शेवलकर, विशाल नेवाळे, सुरेश लंगोटे, कल्याणी वाघमारे, धनश्री हंडे, ज्योती चांदगुडे, प्रीती बिजवे यांच्यासह बीट निरीक्षक व अतिक्रमण पथक सहभागी होते. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, २० एमएसएफ जवान यांच्या उपस्थितीत तसेच ०४ ब्रेकर, ०२ गॅस कटर व सुमारे ४० मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

फुगेवाडी मध्ये ज्या विषारी दारूची विक्री झाली त्या दारू दुकानावर पिंपरी चिंचवड महापालिकेने उशिरा का होईना कारवाई केली आहे. महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडून संबंधित घरमालकाला याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. विषारी दारू पिल्यानंतर दोन दिवसात तब्बल 17 जणांनी आपला जीव गमावला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह आठ जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे . गुरुमंगत सिंग करनेल सिंग बिरका यांनी याच घरातून हा दारूअड्डा चालविला होता. ते बांधकाम महापालिकेने आज गुरुवार 4 जून रोजी पाडले आहे.

यादरम्यान, घटनास्थळी पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी देखील भेट देऊन पाहणी केली आणि कारवाईचा आढावा घेतला. कारवाईदरम्यान पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, १० पोलीस अधिकारी व ५० पोलीस अंमलदार यांच्या चोख बंदोबस्तात ही निष्कासन कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"