फक्त मुद्द्याचं!

31st May 2026
गुन्हेगारी

पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीस लातूर येथून अटक!

पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपीस लातूर येथून अटक!

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : मोशी येथे अल्पवयीन मुलीस मारहाण, शिवीगाळ करून तिची छेडछाड करून फरार झालेल्या आरोपीस एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (मुळगाव गुरदाळ, ता. उदगीर ,जि. लातूर) समीर केदारनाथ शिंदे (रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

आरोपीबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता तो त्यांच्या मूळ गाव गुरदाळ, ता. उदगीर, जि. लातूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व आंमदार यांनी उदगीर येथे जाऊन स्थानिक पोलीस स्टेशन कडील पोलिसांची मदत घेऊन समीर केदारनाथ शिंदे यास कर्नाटक येथे जाण्यासाठी निघाला असताना उदगीर बस डेपो येथे ताब्यात घेऊन अटक केली .अटक आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश खडसे भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत असल्याची माहिती मारुती जगताप पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 यांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त एमआयडीसी भोसरी विभाग सुधाकर यादव, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार, पोलीस निरीक्षक गुन्हे भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापले, पोलिस आंमलदार स्वप्निल शेलार, सुहास कोंडे देशमुख, स्वप्नील झनकर व तपास पथकातील अंमलदार यांनी केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"