12 लाख 10 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा जप्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या फिरत्या पथकाला संशय आल्याने तीन व्यक्तींकडून 23 किलो 538 ग्रॅम वजनाचा 12 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा ताब्यात घेण्यात आला . ही कारवाई गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने बुधवार 27 मे रोजी चाकण दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल वैष्णवी समोर शिक्रापूर चाकण रोड लगत मोहितेवाडी सेल पिंपळगाव तालुका खेड येथे करण्यात आली.

संदीप भगवान हांडे (वय 28, रा. खराबवाडी ता. खेड, मूळ- मु पो पिंपरखेड, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर). गणेश सुरेश तारू (वय 30, मूळ – मु. पो. घोडेगाव, ता. आंबेगाव. जि. पुणे) , रिहान वशिम शेख (वय 19, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड )अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना चाकण -शिक्रापूर रोडवर ,मोहितेवाडी, शेल पिंपळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी आरोपी बाबत शंका आल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली. आरोपीकडून बारा लाख दहा हजार पाचशे रुपये किंमतीचा 23 किलो 538 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ, तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीं विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन ये- थे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुकाळे हे करीत आहेत .याबाबत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अमली पदार्थाच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड 860000 2320 पोलीस हेल्पलाईन मनस क्रमांक 1933infoncbmanas@gov.in यावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.वरील कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप जाधव,पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड,पोलीस शिपाई निखिल शेटे,विजय दौंडकर,सदानंद रुद्राक्ष,गोविंद डोके,निखिल वर्पे,संतोष सपकाळ,चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने केली.

