फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
पिंपरी-चिंचवड

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट!

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट!

पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे तसेच रस्ते विकासाच्या कामांमुळे काही नाल्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, खोल आणि अवघड भागातील नालेसफाईसाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्पायडर मशीनची अनुपलब्धता हीदेखील मोठी अडचण ठरत आहे.

viara vcc
viara vcc

शहरातील १४१ नाल्यांपैकी ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांच्या सफाईचे ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामालाही गती देण्यात आली आहे. गाळ, प्लास्टिक कचरा, झुडपे आणि इतर अडथळे हटवून नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

आरोग्य विभागाकडून संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात असून, अडथळ्यांच्या ठिकाणी पर्यायी पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे

शहरातील एकूण नाले – १४१
नाल्यांची एकूण लांबी – ९४ हजार ९१३ मीटर, एकूण सफाई प्रगती – ८५.८४ टक्के, मेट्रो आणि रस्ते, ड्रेनेज लाईन कामांमुळे काही ठिकाणी अडथळे

पावसाळ्यात नागरिकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते कामांमुळे काही तांत्रिक अडचणी असल्या तरी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. -डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"