फक्त मुद्द्याचं!

19th May 2026
महाराष्ट्र

आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ!

आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ!

दरवाढ करून नागरिकांना महागाईचा दिला झटका
नवी दिल्ली : भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे कारण पुढे करून आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर सरकारने ही दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी मंगळवार 19 मे पासून ही दरवाढ लागू होणार आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैसे दरवाढ करून नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे.

viara vcc
viara vcc

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोलियम कंपन्यांनी दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करून हे सिद्ध केले आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैसे दरवाढ केली होती. आज पुन्हा दरवाढ करून आठवड्याभरात पेट्रोल 3 रुपये 87 पैसे आणि डिझेल 4 रुपये दोन पैसे वाढवले आहेत. एकाच वेळी ही दर वाढ न करता नागरिकांच्या डोळ्यात सरकारने धूळफेक करत ही दरवाढ केली आहे.

इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा काही प्रमाणात केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या डोक्यावर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल दर
नागपूर– 108 रुपये सहा पैसे, भंडारा– 108 रुपये 69 पैसे, पुणे– 108 रुपये 21 पैसे, सोलापूर-108 रूपये 21 पैसे, नाशिक– 108 रुपये 84 पैसे, रत्नागिरी– 109 रुपये 53 पैसे, कोल्हापूर – 108 रुपये 37 पैसे
महाराष्ट्रातील डिझेलचे दर
नागपूर– 94 रुपये 63 पैसे, भंडारा– 95 रुपये 24 पैसे, पुणे– 94 रुपये 40 पैसे, सोलापूर– 94 रुपये 75 पैसे, नाशिक– 95 रुपये 35 पैसे, रत्नागिरी– 96 रुपये सहा पैसे, कोल्हापूर – 94 रुपये 93 पैसे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"