फक्त मुद्द्याचं!

17th May 2026
गुन्हेगारी

एक जमीन गट दोघांना विक्री करुन फसवणूक; गुन्हा दाखल!

एक जमीन गट दोघांना विक्री करुन फसवणूक; गुन्हा दाखल!

आळंदी : जमिनीचे पूर्वी साठेखत, कुलमुखत्यारपत्र, रीतसर खरेदीखत झाले असताना देखील तोच जमीन गट पुन्हा फिर्यादीस विक्री करून त्यांची सत्तर लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सहा डिसेंबर 2023 ते 7 मे 2025 या कालावधीत मौजे आळंदी , चर्होली खुर्द, ता. खेड येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दत्तात्रेय भरत खैरे (वय 40, वडगाव रोड, साईबाबा नगर आळंदी ,ता. खेड) व अन्य व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने जमीन गट नंबर 346 मधील 76 आर क्षेत्रापैकी 40 आर क्षेत्र हे आरोपी यांचे कडून रीतसर खरेदीखत दस्त करून घेतले .परंतु आरोपीने फिर्यादीस यापूर्वी हाच जमीन गट अन्य व्यक्तीला साठेखत, कुलमुखत्यारपत्र ,रीतसर खरेदीखत केलेले असताना देखील पुन्हा महिला फिर्यादीला विक्री करून फसवणूक केली. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तडीपार आदेशाचा भंग ;आरोपीस अटक
पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून घातक शस्त्र कोयता जवळ बाळगून प्रतिबंध आदेशाचा भंग केल्याने एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना 17 16 गुरुवार 14 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे क्रांतीनगर आकुर्डी येथे सार्वजनिक रस्त्यावर घडली.

या प्रकरणी प्रदीप चंद्रसिंग पावरा पोलीस शिपाई, निगडी पोलीस ठाणे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोपाळ अंकुश हळनोर (वय 25, रा. सी/19 ,जय गणेश हाउसिंग सोसायटी घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी आरोपीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून एक वर्षाकरिता तडीपार केले आहे. तरी देखील आरोपी याने तडीपार आदेशाचा भंग करून कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला. शिवाय घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना जवळ लोखंडी कोयता बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार डगळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"