फक्त मुद्द्याचं!

17th May 2026
गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक!

शेअर मार्केटमध्ये पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक!

11 गुंतवणूकदारांची एक कोटी 22 लाख 75 हजार 900 रुपयांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये पाच टक्के प्रति महिना परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी व इतर 11 गुंतवणूकदारांची एक कोटी 22 लाख 75 हजार 900 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 3 एप्रिल 2024 ते आज पर्यंत एनबीएम ट्रेडर्स, आरिस्टो व्हिजन सोसायटी, शिंदे पेट्रोल पंप जवळ, किवळे येथे घडला.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी एका व्यक्तीने (फ्लॅट नंबर 205, श्रद्धा ऑर्चिड ,शिंदे वस्ती ,पाईपलाईन रोड रावेत ) देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .नितीन भास्कर माने (रा. डी 202, मंगल विश्व सोसायटी, किवळे )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करिता प्रतिमहा 5% जास्तीचे परताव्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीकरिता 15 लाख रुपये फिर्यादी कडून घेऊन त्यांना नऊ लाख आठ हजार पाचशे रुपये परत केले. उर्वरित पाच लाख 91 हजार पाचशे रुपये रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. अन्य 11 गुंतवणूकदारांकडून देखील 1 कोटी 16 लाख 84 हजार चारशे रुपये घेऊन असे एकूण 1 कोटी 22 लाख 75 हजार 900 रुपयांची फसवणूक केली. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करून सध्या मोबाईल बंद करून आरोपी पळून गेला आहे .देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"