फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
पिंपरी-चिंचवड

स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : महापौर लांडगे

स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : महापौर लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे साक्षात प्रतीक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान हे आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यलक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील शिल्पास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,माजी नगरसदस्य मारूती भापकर,सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ नखाते,आबासाहेब ढवळे,वैभव जाधव,जीवन बोऱ्हाडे,सागर तापकीर,जितेंद्र छाबडा,संजय कुरबट्टी,हेमा पारिसकर, हेमलता वाडेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"