फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
गुन्हेगारी

ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याचे अमीष ; 21 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक!

ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्याचे अमीष ; 21 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ट्रेडिंग ( risseastock.top ) मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा देतो असे अमीष दाखवून एका व्यक्तीची 21 लाख 34 हजार 399 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 15 मार्च ते तीन मे 2026 या कालावधीत फ्लॅट नंबर 901, डी बिल्डिंग, किंग्सबरी सोसायटी, प्राइड वर्ल्ड सिटी चर्होली बुद्रुक ,ता. हवेली येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे S-VIP 7 MOTiLAL OSWAL या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर फिर्यादीशी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून व्हाईस कॉल व मेसेज वर संपर्क करून आमच्या मार्गदर्शनाने ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा करून देतो असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी त्यांचे सांगणे प्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यावर 21 लाख 34 हजार 399 पैसे पाठवून रिस्टॉक. टॉप (risseastock.top ) या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वरील फिर्यादीचे अकाउंट वर गुंतवणूक केली.

गुंतवणूक केल्यानंतर फिर्यादीचे अकाउंट वर एक कोटी पाच हजार 356 रुपये एवढी रक्कम दिसू लागली. तेव्हा फिर्यादी यांनी सदर अकाऊंट वरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता सदर रक्कम ब्लॉक करण्यात आली. मोबाईल वरून आरोपीने फिर्यादीशी संपर्क करून सांगितले की, जर तुम्हाला तुमचे पैसे काढायचे असेल तर इन्कम टॅक्स कायद्याच्या नियमाप्रमाणे व कंपनीच्या नियमानुसार तुमच्या अकाउंट मध्ये असलेल्या पैशाच्या 15% कॅपिटल गेन टॅक्स म्हणून 15 लाख रुपये रक्कम भरावी लागेल. परंतु फिर्यादीने माझ्याकडे एवढी रक्कम नाही माझे मला पैसे व्याजासकट परत द्या अशी विनंती केली. परंतु 15 लाख रुपये भरले तरच तुम्हाला पैसे काढता येतील असे आरोपीने सांगितले. त्यामुळे फिर्यादीस खात्री झाली की आपली फसवणूक झाली आहे .फिर्यादीने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"