ज्यादा परतावा देण्याचे आमीष दाखवून 28 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : गुंतवणुकीवर पाच ते वीस टक्के ज्यादा परतावा देण्याचे आमीष दाखवून 28 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 मार्च ते 21 एप्रिल 2026 दरम्यान व्हीवा हॉलमार्क, डीएसके रानवारा रोड, बावधन येथे घडली.
याप्रकरणी एका व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टीना मल्होत्रा, सानिका गोखले (दोघांचाही पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी क्रमांक एक व दोन यांनी विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणुकीवर पाच ते वीस टक्के नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून 28 लाख 26 हजार रुपये एवढी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले .ती रक्कम परत न करता अथवा त्या रकमेचा परतावा नफा न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे हे तपास करत आहेत.

मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 1 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक!
पिंपरी : एमजीएल गॅस कनेक्शन कट होणार असे सांगून थकीत गॅस बिल तात्काळ भरा असा मेसेज एका व्यक्तीने करून मोबाईल हॅक करून साउथ इंडियन बँकेच्या क्रेडिट कार्ड क्रमांक मधून एक लाख 58 हजार 800 रुपए ट्रान्सफर करून ऑनलाइन ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना सात मे 2026 दरम्यान काळे वस्ती, चिखली, ता. हवेली येथे फिर्यादीच्या घरी घडली.
याबाबत एका व्यक्तीने अज्ञात इसमाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून एमएनजएल गॅस कट होणार असे खोटे सांगून तुम्ही थकीत गॅस बिल तात्काळ भरा असा मेसेज केला .फिर्यादीने सदर व्यक्तीवर विश्वास ठेवून अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या बिन एमएनजीएल अपडेट या नावाची फाईल ओपन करून त्यामध्ये एमजीएल गॅस बिलाचे थकीत बारा रुपये भरण्यासाठी सदर अँप मध्ये क्रेडिट कार्डची माहिती भरली असता, मोबाईल नंबर वरील अज्ञात इसमाने फिर्यादीचा फोन हॅक करून साउथ इंडियन बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून चार वेळा ट्रांजेक्शन करून एक लाख 58 हजार 800 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले आणि आर्थिक फसवणूक केली. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे हे तपास करत आहेत.

