बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडले ; गुन्हा दाखल!

पिंपरी : न्यायालयीन आदेशानुसार बँकेने जप्त केलेल्या एमआयडीसी भोसरी मधील जयदीप बिजनेस सेंटर अपार्टमेंट कंडोमिनियम मधील शॉप नंबर सात व आठ शॉपचे सील तोडून त्या ठिकाणी दुसरे कुलूप लावल्याने डीसीबी बँक लिमिटेड च्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 29 मार्च ते सात मे 2026 या दरम्यान इंद्रायणी नगर भोसरी एमआयडीसी येथील जयदीप बिझनेस सेंटर अपार्टमेंट मध्ये घडली.

या प्रकरणी संदीप प्रकाश पाटील (रा. मयुरेश्वर बंगलो ,स्वामी विवेकानंदनगर, फेमस चौक, नवी सांगवी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र अजित सिंग सोहळ,),सौ नीलम राजेंद्र सोहळ (घर नंबर 535 / 30 57, अक्षय सोसायटी, संत तुकारामनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांचे न्यायालयीन आदेशानुसार कोर्ट कमिशनर आकाश कांबळे यांनी सील करून बँकेच्या ताब्यात दिलेले एमआयडीसी भोसरी मधील जयदीप बिझनेस सेंटर अपार्टमेंट कंडोमिनियम मधील तिसऱ्या मजल्यावरील शॉप नंबर सात व आठ शॉपचे सील तोडून त्या ठिकाणी दुसरे कुलूप लावले आहे. म्हणून डीसीबी बँक लिमिटेड च्या वतीने आरोपी विरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार बनसोडे हे तपास करत आहेत.

