महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ!

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर केंद्रीय नागरी विमानवाहू मंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद काही काळ रिक्त होते. अजित पवार यांच्या नंतर त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मागील वर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अजित पवार हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. त्याचवेळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील निवडणुकीत उतरले, मात्र दोघांमध्ये दिलजमाई झाल्याने अध्यक्षपदी पवार आणि उपाध्यक्षपदी मोहोळ यांची निवड करण्यात आली.
अजित पवार यांच्या निधनानंतर मुरलीधर मोहोळ यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची बिनविरोध निवडकरण्यात आली.

