सांगवी व दौंड मधून 74 किलो गांजा जप्त; तरुणाला अटक!

सांगवी पोलीसांची कारवाई
पिंपरी : सांगवी पोलिसांनी एका तरुणांकडून 14 किलो गांजा जप्त केला आहे .त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या साथीदाराच्या दौंड येथील घरातून आणखी 60 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले .याप्रकरणी गणेश कैलास चव्हाण (वय 30 रा. गणेगाव खलसा. ता. शिरूर ,पुणे )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याचा साथीदार विनोद ज्ञानेश्वर झरे याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी सांगवी पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एका दुचाकी स्वरावर त्यांचा संशय आला .पोलिसांनी दुचाकीस्वरावरचा पाठलाग केला असता दुचाकीस्वार गणेश याला थांबून त्याच्या दुचाकी वर असलेल्या पोत्याची पाहणी केली. त्यात 14 किलो गांजा आढळून आला .पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. आरोपी गणेश चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विनोद झरे याचे नाव सांगितले. त्याने दौंड तालुक्यातील पाटेठाण येथे गांजा ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी विनोद यांच्या घराच्या परिसरात पाहणी केली असता जनावरांच्या गोठ्यात तब्बल 30 लाख ९ हजार रुपये किमतीचा 60.18 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी एकूण 37 लाख 9 हजार रुपये किमतीचा 74.18 किलो गांजा जप्त केला आहे.
ही कारवाई सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल नांदेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव, पोलीस उपनिरीक्षक रोहित पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश हिंगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निशांत काळे, पोलिस शिपाई शिंदे, काळभोर, ढवळे, सुपे, गोडे, बनकर, खंडागळे, पाटील यांच्या पथकाने केली

