फक्त मुद्द्याचं!

25th April 2026
गुन्हेगारी

डीपी व नावाने व्हाट्सअप मेसेज करून 70 लाख रुपयांची फसवणूक!

डीपी व नावाने व्हाट्सअप मेसेज करून 70 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : कंपनी अकाउंटंट यांच्या व्हाट्सअप वर फिर्यादीचे प्रोफाइल वरील डीपी व नावाने व्हाट्सअप मेसेज करून 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ए व्हीएच ग्लोबल फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड, 501, शांताई क्लासिक, मस्के वस्ती, रावेत या कंपनीच्या कार्यालयात घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्हाट्सअप धारक व बँक खातेदार यांच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीचे कंपनीचा अकाउंटंट मनोज सपकाळ यांचे व्हाट्सअप वर फिर्यादीचे प्रोफाइल वरील डीपी व नावाने व्हाट्सअप मेसेज करून त्यास सदरचा मेसेज फिर्यादी करीत असल्याचे भासवून आयसीआय सीआय बँक खात्यावर 70 लाख रुपये भरण्यास भाग पाडले. परंतु यानंतर पुन्हा तीस लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र सदरचा प्रकार लक्षात आल्याने ते पैसे भरले गेले नाही. अशा प्रकारे 70 लाख रुपयांचा अपहार करून फिर्यादीचे कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याने फिर्यादी यांनी व्हाट्सअप क्रमांक धारक व अकाउंट धारक यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाळे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"