घरगुती गॅस सिलेंडर मधून छोट्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग!

आरोपीस अटक
पिंपरी : खंडेराय गॅस एजन्सी या दुकानांमध्ये मानवी जीवीताला धोका निर्माण होईल अशा प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर मधून छोट्या पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग करताना मिळून आले. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवार 23 एप्रिल रोजी मेदनकरवाडी खंडोबा मंदिराच्या समोर खंडेराय गॅस एजन्सी या दुकानांमध्ये घडली.

याबाबत महादेव अर्जुन कुंभार (वय 40 ,पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय, खेड )यांनी फिर्याद दाखल केली आहे .दीपक सिंग (वय 32, रा. मेदनकरवाडी, ता. खेड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनापरवाना बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून छोट्या पाच किलो वजनाच्या सिलेंडर मध्ये खंडेराया गॅस एजन्सी दुकानांमध्ये नोझल च्या साह्याने गॅस रिफिलिंग केले जात होते. पुरवठा अधिकाऱ्यांनी 21 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या ताब्यातदिला आहे .दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सांगीडवार हे तपास करत आहेत.

